esakal | वन्यप्राण्यांमुळे भंडारा जिल्ह्यात वाढले अपघात; दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

two men are no more in accident

बाजार चौक गोंदिया येथील योगेश हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने नागपूर येथे गेला होता. गुरुवारी गावाकडे परत जात असताना साकोली जवळ मोहघाटा जंगलात दुचाकी घसरून अपघात झाला.

वन्यप्राण्यांमुळे भंडारा जिल्ह्यात वाढले अपघात; दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील मोहघाटा व करडी मार्गावरील खडकी परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, अन्य एक जण गंभीर जखमी झाला.मृतांची नावे योगेश मदनलाल पंजारे (वय 24, रा. गोंदिया) आणि शिवचरण जयपाल धुर्वे (वय 26 रा. मेंढा) अशी आहेत.

बाजार चौक गोंदिया येथील योगेश हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने नागपूर येथे गेला होता. गुरुवारी गावाकडे परत जात असताना साकोली जवळ मोहघाटा जंगलात दुचाकी घसरून अपघात झाला. यात गंभीर जखमी झाल्याने योगेश पंजारे याचा मृत्यू झाला. तसेच सोबत असलेला गौरव नामक त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

दुचाकी खांबावर आदळली

.मेंढा येथील शिवचरण धुर्वे हा दुचाकीने खडकीवरून मेंढा येथे जात होता. भरधाव वेगातील दुचाकीचे संतुलन बिघडल्याने बोंडे फाट्याजवळ चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे दुचाकी दगडावर व विजेच्या खांबावर आदळून अपघात झाला. यात शिवचरण याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती होताच खडकी येथील गावकऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन जखमीला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा मृत्यू झाला होता. खडकी येथील पोलिस पाटील बोंदरे यांनी करडी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. ठाणेदार स्वप्नील नेवसे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे.

वन्यप्राण्यांमुळे वाढले अपघात

जिल्ह्यातील बहुतेक सर्वच मार्गावर जंगल व अभयारण्याचे क्षेत्र आहेत. सध्या शेतातील कोवळे रबी पीक खाण्यास तृणभक्षक प्राणी शेताकडे येतात. त्यांच्याकडे लक्ष वेधल्या गेल्याने वाहन चालकांचे संतुलन बिघडून अपघातात वाढ होत आहे. तसेच शिकारीच्या शोधात वन्यप्राणी मार्गावर आल्यास वेगातील वाहनांमुळे प्राण्यांचा जीव जातो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील जंगलव्याप्त भागात प्राण्यांसाठी अंडरपास काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ