जीएसटी कार्यालयातील दोन अधिकारी बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

नागपूर : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सिमा शुल्क मंडळाने शुक्रवारी भोपाळ विभागातील आठ अधिक्षकांना अचानक बडतर्फ केले. त्यात के.के. उईके आणि एस.आर. पराते हे दोन अधिक्षक नागपूरातील आहेत. या अधिक्षकांवर अचानक कारवाई झाल्याने विभागात खळबळ उडाली आहे.

इंदुर येथे 2011 मध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्याप्रकरणी 2016 मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2018 साली तपास करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या तपासाचा अहवाल येण्यापुर्वीच मंडळाने अचानक निर्णय घेऊन आठ अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली. नागपुरातील दोन्ही अधिकारी नियमितपणे कार्यालयात आले. ते दोघेही कार्यालयात पोहचताच आयुक्तांनी त्यांना बोलावून घेतले. तीन महिन्याच्या वेतनाचा धनादेश आणि आदेशाची प्रत दिली. ताबडतोब घरी जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली. आठ पैकी दोन नागपूर, पाच इंदुर आणि एक रायपूर येथील अधिकारी आहेत. त्यातील काही अधिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two officers suspended