शिराळा फाट्याजवळ अपघात; दोघे ठार तर एक गंभीर

two people died in road accident in Amravati
two people died in road accident in Amravati
Updated on

अमरावती : शिराळा फाट्याजवळ प्रवासी ऑटो व दुचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. रविवारी (ता. सहा) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिराळा फाट्यासमोर एमएच २७ बीडब्ल्यू १८९८ क्रमांकाचा चालक शेख शादिक शेख मेहमूद (वय ३६, रा. लालखडी) व दुचाकीस्वार सय्यद सोहेल अलीम (वय १८, रा. चांदूरबाजार) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे वलगाव पोलिसांनी सांगितले. शेख समीर शेख गफफार (वय ३०) हा अपघातात जखमी झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.

वलगाव पोलिसांना कळताच घटनास्थळी ऑटो आणि दुचाकीस्वारांसह त्यांची वाहने रस्त्यावर विखुरलेली दिसली. अपघातानंतर जखमी बऱ्याच वेळेपर्यंत घटनास्थळी पडून असावे, अशी शक्यता आहे. पोलिसांना काही नागरिकांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर वलगाव पोलिसांनी ऑटो व दुचाकीस्वार दोघेही वेगात वाहन चालवित असल्याने ही घटना घडली. त्यामुळे या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com