भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले! आठ वर्षांचा चिमुकला ठार

two wheeler collision one man killed in akola
two wheeler collision one man killed in akola
Updated on

बोरगाव मंजू (जि.अकोला) : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर वणीरंभापुर नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर ट्रकने दुचाकीला उडविले या अपघातात दोन जण जखमी झाले,तर एक आठ वर्षांचा चिमुकला ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दरम्यान घडली,सम्राट वानखडे असे मुतकाचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार कोठारी येथुन बोरगाव मंजू येथे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.30 बी.जी.3006 वरून निशांत गवई रा.कोठारी व बहीण सुजाता पवन वानखडे, मुलगा सम्राट पवन वानखडे वय आठ वर्ष हे तिघे कोठारी येथुन बोरगाव मंजू येथे येत असताना बोरगाव मंजू कडुन भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकर ट्रक क्रमांक एम.एच.48 ए.वाय,0396 या वाहनाने दुचाकीला उडविले, या अपघातात निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे हे गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार हरिश गवळी यांचेसह पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला, दरम्यान गंभीर जखमी झालेल्या निशांत गवई, सुजाता वानखडे,सम्राट वानखडे उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सम्राट वय आठ वर्ष यास डॉक्टरांनी मृत घोषित केले, या घटनेची बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी फिर्याद दिली वरून बोरगाव मंजू पोलिस सदर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर ट्रक सह चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी सह पोलीस करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com