
साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील उकारा फाट्याजवळ शनिवारी (ता.३१) रोजी दुपारी एका विचित्र अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही रोजगाराच्या शोधात नागपूरकडे निघाले होते. मृतांमध्ये आमगाव तालुक्यातील यादवराव गोपालराव वघारे (वय ३६) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८) यांचा समावेश आहे.