Gondia News : वाघनदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू; पोलिस होण्याचे स्वप्न भंगले, अंघोळ करणे जिवावर बेतले
Drown Incident : आमगाव तालुक्यात वाघनदीत अंघोळीला गेलेल्या दोन युवकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला. हे दोघेही पोलिस भरतीसाठी तयारी करत होते, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आमगाव (जि. गोंदिया) : तालुक्यातील कालीमाटीजवळच्या वाघनदीत अंघोळीकरिता उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २५) सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली.