Wardha News : वीज कोसळून दोन युवक ठार; कारंजा येथील घटना, मृतक दोघेही एकाच कुटुंबातील
Lightning Strike : कारंजा येथील शेतात कपाशी लागवडीसाठी गेलेले रितेश आणि राजेश सरोदे हे पावसात झाडाखाली थांबले असता वीज कोसळून दोघेही ठार झाले. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
कारंजा (जि. वर्धा ) : शेतात काम करताना आलेल्या पावसापासून बचावाकरिता झाडाखाली उभ्या असलेल्या दोन युवकांवर वीज कोसळली. यात दोघेही जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी (ता. २६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.