

A case has been registered against the Baldi village sarpanch in Umarkhed over an alleged offensive social media post targeting the Maratha and Kunbi communities.
esakal
उमरखेड : तालुक्यातील बाळदी येथील समाजमाध्यमातील एका ग्रुपवर मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून सरपंचाविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गावातील मराठा समाजबांधवांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.