
उमरेड : उमरेड - भिवापूर महामार्गाने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची (वाळू) अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती विभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांना मिळताच त्यांनी आपल्या पोलिस ताफ्यासह कडक कारवाई करीत अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या दोन टिप्परसह ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.