Family Stress : आईच्या आजाराने त्रस्त मुलाने तणावातून संपवले जीवन; उमरेड येथील घटना
Mental Health: उमरेड येथील ३० वर्षीय राहुल बालपांडे याने मानसिक तणावातून गळफास घेऊन जीवन संपवले. आईच्या दीर्घकालीन आजारपणामुळे तो तणावात होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
उमरेड : येथील एकराजे हॉटेलच्या मागे असलेल्या मानशक्ती ले-आउटमध्ये राहणाऱ्या तीस वर्षीय राहुल राजेन्द्र बालपांडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.६) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.