Sangrampur News : विनापरवानगी बसविला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बु. येथे विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.
Crime
Crimesakal
Updated on

संग्रामपूर - तालुक्यातील पातुर्डा बु. येथे विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध तामगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पातुर्डा बु. येथील आठवडी बाजारातील सरकारी जागेत ११ मार्चचे मध्यरात्री काही जणांनी चबुतरा उभारून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसविला.

याची माहिती मिळताच ग्रामपंचायत अधिकारी धीरज मारोडे यांनी पुतळ्याची पाहणी करून तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांना माहिती दिली. यावेळी दोन्ही अधिकारी गावात दाखल झाले. दरम्यान शांतता राहावी यासाठी ठाणेदार यांनी वरिष्ठांना कळविले व दंगा काबू पथकासह पोलिस कर्मचारी पातुर्डा येथे दाखल झाले होते.

दरम्यान ठाणेदार पवार, नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे, ग्रामपंचायत अधिकारी धीरज मारोडे, भाजप तालुका अध्यक्ष लोकेश राठी, सरपंच रणजित गांगतिरे, सदस्य निलेश चांडक, ज्ञानु धर्माळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन केले व नंतर प्रशासकीय कार्यवाही करून पुतळ्याला झाकून ठेवण्यात आले आहे.

याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी धीरज मारोडे यांनी तामगाव पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com