esakal | सासऱ्याच्या शेतातून निघाला जावई अन् वाटेत गेला काका पुतण्याचा जीव
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सासऱ्याच्या शेतातून निघाला जावई अन् वाटेत गेला काका पुतण्याचा जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : जंगली प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाचा स्पर्श झाल्याने काका-पुतण्यासह म्हैस व कुत्राही जागीच गतप्राण झाला. ही घटना बुधवारी (ता. २९) रात्री ईसापूर धरण शेत शिवारात घडली. गौतम निवृत्ती आठवले (वय ३८) व कुणाल बबन आठवले (वय १६) रा. ईसापूर, धरण, ता. पुसद असे मृताचे नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सासऱ्याच्या शेतातून त्याच परिसरात असलेल्या स्वतःच्या शेतात गौतम आठवले पुतण्याला सोबत घेऊन म्हैस नेत होता. शेजारील शेतीच्या कडेला असलेल्या विद्युत प्रवाहीत तारकुंपनाचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोबस असलेले म्हैस व कुत्राही विजेच्या धक्क्याने ठार झाले. तरुण कास्तकाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Video : बस पुरात वाहून गेली; चौघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठविले. या प्रकरणात ईसापूर येथील शेत मालकावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

loading image
go to top