Electric Shock Accident : शेतात काम करताना वीजेचा शॉक; एकाचवेळी काका-पुतण्याचा मृत्यू
Amravati News : मोर्शी तालुक्यातील निंभी गावात शेतात काम करताना काका-पुतण्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सकाळी पाणी देताना मोटार हलविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली.
शिरखेड : मोर्शी तालुक्यातील निंभी गावामध्ये शेतात काम करीत असताना एकाचवेळी काका व पुतण्याचा विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला. शनिवारी (ता. १७) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली.