वेणा नदीत काका-पुतण्या बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

हिंगणा  (जि.नागपूर) तालुक्‍यातील संगम व खैरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेले दोघे जण बुडल्याची घटना बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. बुडालेले काका-पुतणे आहेत. या घटनेमुळे डिगडोह गावात शोककळा पसरली आहे. 

सुरेश शिवराम फिरके ( 48) व अजिंक्‍य रमेश फिरके (18, दोघेही रा. डिगडोह देवी, एमआयडीसी, हिंगणा रोड, नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी डिगडोह देवी येथील फिरके व आजूबाजूला असलेल्या दोन घरांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. काही लोक विसर्जनासाठी खैरी पन्नासे गावाजवळच्या वेणा नदीवर गेले. सायंकाळी 6:30 च्या सुमारास विसर्जन आटोपून अंघोळ करताना काका सुरेश खोल पाण्यात गेला. त्याला वाचविण्यासाठी अजिंक्‍य धावला. परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहात स्वतःला सांभाळू शकले नाहीत. पाण्याच्या प्रवाहात ते दोघेही वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगण्याच्या पोलिस निरीक्षक सपना क्षीरसागर व हेड कॉन्स्टेबल बदखलसह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. परंतु अद्याप प्रवाहात त्यांचा शोध लागला नाही. या घटनेमुळे डिगडोह गावात शोककळा पसरली आहे. वृत्त लिहीपर्यंत दोघांचाही पत्ता लागला नव्हता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncles and aunts drowned in the river Vena