Yavatmal Crime : यवतमाळ जवळ अनोळखी तरुणाचा खून; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
Crime News : यवतमाळ येथील चौसाळा मार्गावर एका अनोळखी तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिस सध्या मृतकाची ओळख पटविण्यासाठी तपास करत आहेत.
यवतमाळ : एका अनोळखी तरुणाचा खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शहरालगतच्या चौसाळा मार्गावर गुरुवारी (ता.१५) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.