Education News: आश्रमशाळेतील लाखो विद्यार्थी गणवेशाविना; तयार गणवेशाचे आदिवासी विकास विभागाचे नियोजन फिसकटले
School Uniform Delay: आदिवासी विकास विभागाच्या ४९९ आश्रमशाळांतील लाखो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांना जुनाच गणवेश परिधान करावा लागत आहे.
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही. गणवेश तयार मिळणार असल्याचे विभागाने जाहीर केले होते. परंतु, नियोजन फिसकटले असल्याचे दिसून येते.