esakal | लोकबिरादरी प्रकल्पात बच्चेकंपनीने सादर केला अनोखा कलाविष्कार
sakal

बोलून बातमी शोधा

भामरागड : कार्यक्रमाला उपस्थित अनिकेत आमटे, समीक्षा आमटे व विद्यार्थी.

यावर्षी 14 नोव्हेंबरपूर्वीच दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालकदिनाचा कार्यक्रम होऊ शकणार नव्हता. त्यामुळे लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या कल्पनेतून साकारलेला बालमहोत्सव शुक्रवारी (ता. 11) नोव्हेंबरलाच घेण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात विविध उपक्रमांची रेलचेल होती.

लोकबिरादरी प्रकल्पात बच्चेकंपनीने सादर केला अनोखा कलाविष्कार

sakal_logo
By
लीलाधर कसारे

भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे बालकदिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरला बच्चेकंपनीकरिता विविध उपक्रम घेऊन बालमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी १४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजेचा मुहूर्त आला आहे.

यावर्षी 14 नोव्हेंबरपूर्वीच दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालकदिनाचा कार्यक्रम होऊ शकणार नव्हता. त्यामुळे लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या कल्पनेतून साकारलेला बालमहोत्सव शुक्रवारी (ता. 11) नोव्हेंबरलाच घेण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात विविध उपक्रमांची रेलचेल होती. बच्चेकंपनी सोबत मोठ्यांनीसुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेतला.

सकाळच्या सत्रात मुलांनी साकारलेल्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये प्रतापगड, तोरणा, सिंहगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग, आग्रा फोर्ट, लाल महाल आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती उत्तमप्रकारे साकारण्यात आल्या होत्या. दुपारच्या सत्रात मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. यामध्ये तोलसंयम, ग्लॉस गेम, रिंग गेम, बिस्कीट इन द एअर, न्यू हेअरस्टाईल, रिंग-बाल गेम, नक्षीदार हात मेहंदी, बॉडीआर्टमध्ये फेस पेंटिंग, टॅटू पेंटिंग आदी खेळ व उपक्रम घेण्यात आले.

जाणून घ्या  : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता


मुलांनी केले गीतगायन

लहान मुलांनी मजेदार गीतगायन करून श्रोत्यांची मने जिंकली. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकीनी आमटे या उभयतांनी मुलांचे कौतुक केले. यावेळी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, अनघा आमटे, समीक्षा आमटे, प्रसिद्ध साहित्यिक नेगलकार विलास मनोहर, गोपाळ फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते.

बच्चेकंपनी व मोठ्यांनीही विविध विषयांवर उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी विविध स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त मुला-मुलींना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमासाठी कांचन गाडगीळ, तुषार कापगते, प्रा.गिरीश कुलकर्णी, प्रा. खुशाल पवार, शिल्पा मोहिते, अशोक चापले, प्रफुल्ल पवार, अशोक गायकवाड, जमीर शेख, विजय चांगण, शांती गायकवाड, ऋतुजा फडणीस, रूपा चापले, मनिषा पवार आदींनी सहकार्य केले.

अवश्य वाचा : खरेदी जोमात, कोरोना कोमात; धनत्रयोदशीला नागरिकांची बाजारात प्रचंड गर्दी


चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी

सायंकाळच्या सत्रात खाद्यसंस्कृती उपक्रमाअंतर्गत चटक-मटक भेळ, चविष्ट बनाना चिप्स, भारतीय फ्रेंच फ्राईज, पौष्टिक नाचणी खीर आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. प्रकल्पातील सर्वांनी खाद्यपदार्थांची मनसोक्त चव चाखली. सायंकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)