esakal | विद्यापीठ राबविणार "टोबॅको फ्री युथ' अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ राबविणार "टोबॅको फ्री युथ' अभियान

विद्यापीठ राबविणार "टोबॅको फ्री युथ' अभियान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून विद्यार्थी आणि तरुणांना दूर ठेवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने "प्लेज फॉर लाईफ, टोबॅको फ्री युथ' हे अभियान हाती घेतले आहे. हे अभियान संबंध हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून राबविले जाणार असून केअरिंग फ्रेंड्‌स आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागातर्फे शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
गुरुनानक भवन येथे शुक्रवारी या अभियानाचे उद्‌घाटन प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. नागपूरमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व प्रकल्प अधिकरी आणि शंभर महाविद्यालयाचे स्वयंसेवक या अभियानात सहभागी होणार आहेत. उद्‌घाटन समारंभाला व्हीएसपीएम दंत महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे मुख कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. प्रणव इंगोले तसेच प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी स्वयंसेवकांना तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डी. व्ही. पातूरकर, आरोग्य विभागाच्या संचालक साधना तायडे, संचालक डॉ. केशव वाळके यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
loading image
go to top