भयंकरच! नराधमाचे दोन वर्षांच्या मुलाशी केले असे...

crime
crime

चिमूर(जि. चंद्रपूर) : विकृत मनोवृत्तीची माणसे कुठल्या थराला जातील याचा नेम नाही. एका विकृताने चक्क २ वर्षाच्या मुलाशी अनैतिक कृत्य केले. चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेकेपार येथे आरोपी आशिष आनंदराव कुलमेथे वय 25 वर्ष रा टेकेपार याने त्याच्या घराशेजारी राहणार्या 02 वर्षाच्या मुलाला स्वतःचे घरी नेऊन त्यांचेशी अनैतिक कृत्य केल्याची घटना मंगळवारी दुपारी उजेडात आली

चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील आरोपी आशिष आनंदराव कुलमेथे याने त्याच्या घराशेजारी राहणार्या दोन वर्षांच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य करताना मुलाच्या आईने स्वतः पाहिले. आरोपीस हटकले असता आरोपीने मुलाचे आईस शिवीगाळ केली

सविस्तर वाचा - बापरे ३५ लाख पाण्यात; महापालिकेचे ‘नाम बडे, दर्शन खोटे‘, वाचा काय झाला प्रकार...

या घटनेची तक्रार मुलाच्या आईने चिमूर पोलिसात दिली. तक्रारी वरून चिमूर पोलिसांनी आरोपी आशिष आनंदराव कुलमेथे याचे वर कलम 377,504 भांदवी सहकलम 5 म, 7,8 पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस निरीक्षक कांता रेजिवाड तपास करीत आहे  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com