Vidarbha Weather : चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान केले. ह्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर संकट उभं राहिलं आहे.
चंद्रपूर : ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’च्या प्रभावामुळे सध्या विदर्भात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर तालुक्यात रविवार (ता. ४) दुपारच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.