
मोताळा : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून बऱ्याच ठिकाणी तुरळक स्वरुपात पावसाने हजेरी लावली. अवेळी आलेला पावस व वातारणातील बदलामुळे रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे रब्बी पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.