Unseasonal Rain : अवकाळीमुळे भाजीपाला, केळी पिकाचे नुकसान; तेल्हाऱ्यातील २५ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त
Nagpur Weather : तेल्हाऱ्यात अवकाळी वादळी वाऱ्यामुळे २५ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला आणि केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
नागपूर : हवामान विभागाने शनिवारी (ता.१७) रोजी विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली होती. काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला होता. त्याप्रमाणे विदर्भातील अनेक जिल्ह्यात वातावरणामुळे तापमानात चढ-उतार जाणवला.