Final Rites of 'Premlanath' : छे ! माणुसकी मेली नाही, ती तर अजूनही जिवंत आहे, ‘प्रेमळनाथ’च्या अंत्यसंस्कारासाठी एकवटले गाव
Village Gathers for Premlanath's Funeral : पांडेगावच्या एकनाथ याच्या जीवनात पैसा, ओळख किंवा नाते यापेक्षा अधिक महत्त्व असलेली गोष्ट होती, ती म्हणजे त्याचा प्रेमळ स्वभाव. कोणताही रक्तसंबंध नसताना गावकऱ्यांनी त्याच्या निधनानंतर सामूहिकपणे त्याचे अंतिम संस्कार केले, ही त्याच्या जीवनाची खरी श्रद्धांजली होती.
साळवा (ता.कुही) : पैसा, ओळख, नाते... याशिवायही माणूस कोणाच्या हृदयात स्थान मिळवू शकतो, हे पांडेगावने दाखवून दिले आहे. एकनाथ नावाचा एक अनोळखी वृद्ध पन्नासहून अधिक वर्ष गावात राहत होता.