
नागपूर : हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरवत रविवारी (ता.१८) रोजीही विदर्भातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे बुलडाण्यातील नांदुरा येथे हाहाकार उडवून दिला. यवतमाळात १३० हेक्टर पिकांचे नुकसान झाले तर अमरावतीतील धारणीला पावसाचा जबर तडाखा बसला आहे.