
यवतमाळ : लॉकडाउनमध्ये संपूर्ण जग थांबले असताना यवतमाळातील वैद्यकीय महाविद्यालयात तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर व्हीआरडीएल (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लेबॉरटरी) अर्थात विषाणू संशोधन व निदान प्रयोशाळा उभी राहिली. किती रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, निगेटिव्ह आले, याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता जनतेला लागली राहते. आठवडाभरापासून यवतमाळात नॉनस्टॉप कोरोना चाचणी केली जात आहे.
24 तासांत 125 पेक्षा जास्त चाचण्या करण्याची क्षमता
कोरोनाचे यवतमाळात मार्च महिन्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच प्रयोशशाळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, सर्वात आधी जागेचा प्रश्न निर्माण झाला. दोन हजार स्केअरफूट जागेचा प्रश्न निकाली निघत नाही तोच लॉकडाउनची घोषणा झाली. प्रयोशशाळेचे बांधकाम सुरू असतानाच मजरही मिळेनासे झाले. त्यामुळे प्रयोगशाळा सुरू होणार का?, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मशिनरीच विदेशात अडकून पडल्या. अखेर जून महिन्यात व्हीआरडीएल प्रयोगशाळा सुरू झाली. कोरोनासह अन्य विषाणूजन्य आजाराचे निदान यवतमाळातच होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रयोगशाळेत 24 तासांत 125 पेक्षा जास्त चाचण्या करण्याची क्षमता आहे.
कोरोनाच्या लढ्यात प्रत्येक विभाग आणि त्यातील योद्घयांची चर्चा होत असताना जीवाची बाजी लावून चाचणी करणाऱ्या फ्रंटलाइन वॉरिअरकडे कुणाचे लक्ष गेले नाही. स्बॅव तपासणी करताना तंत्रज्ञ आणि डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी बायो सेफ्टी कॅबिनेट व पीपीई किट वापरली जात असल्याची माहिती सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विवेक गुजर यांनी दिली. आतापर्यंत 350 नमूने प्रयोगशाळेत तपासण्यात आली. त्यापैकी 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळी नऊ ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत या प्रयोशाळेत कामकाज चालते. अद्ययावत उपकरणे अमेरिका, सिंगापूर, जर्मनी येथून आणली आहे. त्यामुळे ही प्रयोशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनली आहे. अकरा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ सहा कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर गाडा ओढला जात आहे. त्यामुळे कार्यरत तंत्रज्ञांवर ताण वाढत असतानाही कोरोनाला हरविण्यासाठी लढा देत आहेत. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. विवेक गुजर आदींनी सातत्य ठेवल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोशाळा उभी झाली.
कान, नका, घसा तज्ज्ञ संशयितांचे स्बॅव घेऊन प्रयोशशाळेत पाठवितात. सर्वप्रथम सॅम्पल रिसेप्शन रूममध्ये नोंदणी करून स्वॅब स्विकारले जाते. प्रोसेसिंग रूममध्ये स्वॅबवर (स्त्राव) प्रक्रिया केली जाते. एक्सट्रॅक्शन रूमध्ये व्हायरसमध्ये न्युक्लीक ऍसिड राहते. येथे आरएनए ऍसिड वेगळे केले जाते. आरटी पीसीआर रूममध्ये नमूने पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह यावर शिक्कामोर्तब केले जाते.
कोरोना संकटकाळात यवतमाळात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरू झाली, ही खूब मोठी उपलब्धी आहे. इतरही विषाणूजन्य आजाराचे निदान या प्रयोशशाळेच्या माध्यमातून केले जाणार आहे. आम्हाला नागपूर येथील एम्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-डॉ. विवेक गुजर, सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.