

अमरावती (अंजनगावसुर्जी) : सध्या होळीमध्ये विविध प्रकारचे रासायनिक रंग वापरल्या जातात. त्याऐवजी नैसर्गिक रंग वापरल्यास आरोग्याला हानी पोहोचणार नाही व ग्रामीण भागातील लोकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल. परंतु यासाठी पळसाची लागवड करण्याची गरज असल्याचे मत राधाबाई सारडा महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मंगेश डगवाल यांनी व्यक्त केले.