esakal | महिलांचा वापर, मद्यपान करण्यासाठी युवा
sakal

बोलून बातमी शोधा

file phote

महिलांचा वापर, मद्यपान करण्यासाठी युवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेतून मोठ्या प्रमाणावर मद्यतस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस सक्रिय झाले. दोनच दिवसांमध्ये रेल्वेगाड्यांधून चार महिलांसह एकूण सहा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून मद्याच्या एकूण दोन हजार 255 बाटल्या हस्तगत केल्या. रोजगार मिळत नसल्याने केवळ 500 रुपयांसाठी महिला व तरुण मद्यतस्करीसाठी तयार होत असल्याची बाब समोर आली आहे.पोळा, गणेशोत्सव व त्यापोठोपाठ येणाऱ्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमधील अवैध मद्यविक्रेत्यांकडून आतापासूनच दारूचा साठा करून ठेवण्यात येत आहे. सर्वाधिक सोयीचा पर्याय म्हणून मद्यतस्करीसाठी रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे. त्यातही सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी महिला व तरुणांना या प्रकारात लोटले जात आहे. ग्रामीण भागात रोजगार नाही, कमी श्रमात 500 रुपये मिळत असल्याने ते सर्व धोके स्वीकारून मद्यतस्करीसाठी तयार होत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी तस्करांवर लक्ष केंद्रित केले आहे.
12577 बागमती एक्‍स्प्रेसमधून मद्याची खेप जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने बुटीबोरी रेल्वेस्थानक गाठले. गाडी येताच तपासणी सुरू केली. एस-11 बोगीतील 37, 38 क्रमांकाच्या बर्थवर असलेल्या चार महिलांकडे चार ट्रॉली बॅग आढळल्या. त्या उघडताच विदेशी मद्याच्या एकूण एक हजार 250 बाटल्या मिळाल्या. पोलिसांनी गुन्हा नोंदवून महिलांना अटक केली. याचप्रमाणे गुरुवारी 12891 दाणापूर एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करण्यात आली. 23 ते 25 वयोगटातील दोघे बॅगमधून दारूच्या बाटल्या नेताना आढळले. त्यांच्याकडून एक हजार पाच दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

loading image
go to top