esakal | विदर्भाची कन्या 'BRO'ची पहिली महिला कमांडिंग ऑफिसर, वाचा वैशाली हिवसेंचा लहानपणापासूनचा प्रवास

बोलून बातमी शोधा

vaishali hiwase
विदर्भाची कन्या 'BRO'ची पहिली महिला कमांडिंग ऑफिसर, वाचा वैशाली हिवसेंचा लहानपणापासूनचा प्रवास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : जिल्ह्यातील आर्वी येथील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने कमांडिंग ऑफिसरपदी नियुक्ती केली आहे. या पदावर कार्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.(आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली असल्याने आर्वीची कन्या म्हणून विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

वैशाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल हायस्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर येथील नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नागपूरला रामदेव बाबा कॉलेजमध्ये एमटेक पूर्ण करून युपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये त्यांची निवड झाली. हे बीआरओ आर्मीसोबत सलग्न असून डिफेन्सच्या अंडरमध्ये आहे. चीन चायना बॉर्डर सध्याचे बांधकाम सुरू आहे. त्यांचा पूर्ण कार्यभार व त्यांची देखरेख वैशालकडे आहे. डिफेन्स आणि आर्मीशी निगडीत दहा वर्षांपासून त्या येथे कार्यरत आहेत.

देश सेवा व आई वडिलांच्या या इच्छेची पुतर्ता - येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षक स्व. सुरेशचंद्र हिवसे यांनी वैशालीला बालवयातच देशसेवेचे धडे दिले आणि त्याच जिद्दीने तिने परिश्रम घेतले. दहावी, बारावी व अभियांत्रीकीचे शिक्षण घेतल्यानंतर वैशालीने एमटेकचे शिक्षण घेतले. यासोबतच एम.पी.एस.सी व युपीएससीची परीक्षा दिली. एमपीएससीच्या माध्यमातून एरिगेशन डिपॉर्टमेंटमध्ये तिचे असिस्टंट अभियंता पदावर निवड झाली. मात्र, तिने ती नोकरी पत्करली नाही. यानंतर लगेच युपीएससीच्या माध्यमातून बीआरओमध्ये तिची अभीयंता पदावर निवड झाली. या मध्यमातून तिने वडीलाची देशसेवेची ईच्छा पूर्ण केली.
- प्रीती हिवसे, वैशालीची आई