

Washim News
esakal
वाशीम: चार, पाच वर्षांपूर्वी उन्हाळा लागण्याआधीच वाळकी, दोडकी या जुळ्या गावात होरपळ सुरू होत होती. वाशीम तहसील कार्यालयातून पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्ह्यात पहिला टँकर याच गावात सुरू होत होता. मात्र या दोन्ही गावाच्या गावाकऱ्यांनी लोकसहभागातून नाल्याचे खोलीकरण केल्याने हे गाव कायमचे टँकर मुक्त तर झालेच उलट या गावाच्या रिचार्ज पिट या संकल्पनेचे जिल्ह्यात अनुकरण झाले आहे.