Wardha News: आरती चौकातील पेट्रोलपंपावर नियमांचा फज्जा; ग्राहकांना उन्हाचे चटके, तर कर्मचाऱ्यांचीही रखरखत्या उन्हात ससेहोलपट

Intense Heat Hits Customers and Staff at Vardha Petrol Pump: आरती चौकातील पेट्रोलपंपवर ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना भरउन्हाळ्यात भीषण त्रास; शेड, पाणी, स्वच्छतागृह सुविधांचा अभाव, नियमांचे उल्लंघन, वर्धा नागरिक संतापित.
Wardha News

Wardha News

esakal

Updated on

वर्धा: भरउन्हाळ्यात पारा ४५ अंशांच्या पार गेला असताना वर्धा शहरातील वर्दळीच्या आरती चौकातील एका पेट्रोलपंपावर ग्राहकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या पंपावर सावलीसाठी साधे शेडदेखील नसल्याने ग्राहकांना भर उन्हात उभे राहून पेट्रोल भरावे लागत आहे.

विशेष म्हणजे, केवळ ग्राहकच नव्हे, तर येथील कर्मचारीही उन्हातच उभे राहून सेवा देत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने या पंपाचा परवाना रद्द करण्याची मागणी आता वर्धेकरांतून हाेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com