

Vardha News
esakal
वर्धा: शहरात शनिवारी (ता. ४) रात्री एका लग्नसमारंभात रक्ताचा सडा पडला. जमिनीच्या वादातून पुतण्याने काका आणि चुलत भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांची जीवनयात्रा संपवली. वरातीच्या जल्लोषात घडलेल्या या भीषण शोकांतिकेमुळे लग्नाचे घर सुतकात बुडाले. महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण वर्धा शहर हादरून गेले आहे. आराेपीला पाेलिसांनी अटक केली.