

Wardha News
esakal
वर्धा: जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची गत काही काळापासून झालेली दुर्दशा आता लवकरच दूर होणार आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (२०२६-२७) तब्बल ११ कोटी नऊ लाख ५८ हजार रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या शाळांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे वातावरण अधिक आनंददायी होणार आहे.