भाज्यांचे दर गगनाला, महागाईमुळे हरवला सणांचा गोडवा

राजेश रामपूरकर
Wednesday, 21 October 2020

नागपूरातील कळमना आणि महात्मा फुले बाजारात भाज्यांची आवक महिनाभरापासून कमी झालेली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील विविध भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नागपूर  ः परतीच्या पावसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसू लागला असून, त्यांचे खिसे चांगलेच हलके होत आहेत. पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाल्याचे कारण पुढे करीत सर्वच भाज्या अधिकच्या दरात विकल्या जात आहेत. आधीच कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना वाढत्या महागाईमुळे सणांचा गोडवा हरवला आहे. आज काय करायचे, हा एकच प्रश्न सध्या गृहिणींसमोर आहे.

नागपूरातील कळमना आणि महात्मा फुले बाजारात भाज्यांची आवक महिनाभरापासून कमी झालेली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील विविध भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक ४०ते ५० टक्क्यांनी कमी झालेली आहे. 

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स
 

घाऊक बाजारातही काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी किरकोळ विक्रेते मात्र अधिकच्य दराने भाज्यांची विक्री केली जात आहे. घाऊक भाजी बाजारात ४० रुपये किलो दराने मिळणारा कोबी किरकोळ विक्रेते १०० रुपयांना विकतात. २० ते ८० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या पानकोबी, गवार, पडवल, गवार, कारले, शिमला मिरचीच्या दरांनी तर किरकोळीत शंभरी गाठली आहे. एरवीच्या तुलनेत या भाज्यांचे घाऊक बाजारातील दरही चढेच असले तरी किरकोळीत मात्र परतीच्या पावसाचे कारण पुढे करून आपली पोळी भाजत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला.
 

पुढील महिनाभर दर चढेच
परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने भाज्यांचे दर वाढलेले आहेत. ही स्थिती पुढील एक महिना राहणार असून, स्वस्त भाज्यांसाठी आता काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
राम महाजन, घाऊक भाजी विक्रेते
-

 1. भाज्या   घाऊक  किरकोळ
  भेंडी     ४०  ८०
  गवार ६०  १००
  शिमला मिरची  ८०  
  १००  
  फुलकोबी  ४०
  ८०  
  पानकोबी २० ८०
  टोमॅटो ३० ६०
  कारले ६० १००
  वांगी २५ ६०
  हिरवी मिरची ६० १००
  पालक २० ८०
  मेथी  १०० १४०
  काकडी २० ६०
  मुळा ३० ८०
  कोहळ ३० ६०
  दुधी भोपळा २० ६० 

   

संपादित - अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices rise due to return rains