पिके नष्ट होण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

वनोजाबाग(अमरावती) : मागील एक महिन्यापासून अधूनमधून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील वनोजाबाग, गावंडगाव, सातेगाव, कुंभारगाव, चिंचोली, हिंगणी तसेच आजूबाजूच्या खेड्यागावातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची पूर्णपणे नासाडी होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पीकविमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सुरुवातील पाऊस न आल्यामुळे मूग व उडीद ही पिके नष्ट झाली. त्यानंतर काही दिवसांनी पावसाला सुरुवात झाली. असे असताना तूर, कपाशी, सोयाबीन ही पिके शेतात डोलू लागली. मात्र सततच्या पावसामुळे शेतात उभी असलेली पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांना उत्पन्नदेखील कमी होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, शासनाने शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पीकविमा देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य मिळाल्यास
कमीत कमी रब्बीचे नियोजन तरी करता येणार असल्याचे बोलले जात आहे. कृषी अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the verge of destruction of crops