
नागपूर : ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देत त्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद आहे. मागील वर्षभरात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत नागपूर विभागात २९३ गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांवर ॲट्रासिटीचे गुन्हे नोंदविले गेले. मात्र, या कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या मदतीपासून १७७ पीडित वंचित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २ कोटी ४० लाख रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत मिळणारी मदत रखडली आहे.