Drought Crisis: विदर्भात सहा दिवसांत दहा शेतकऱ्यांनी संपवला जीव; आर्थिक मदतीची मागणी

10 Farmers Die by Suicide in Six Days : विदर्भात सहा दिवसांत दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. शेतकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत, कर्जमुक्ती आणि शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित न्याय्य भाव देण्याची मागणी त्यांनी केली.
Kishor Tiwari demands immediate financial assistance and fair prices for farmers amid the reported suicide cases in Vidarbha.

Kishor Tiwari demands immediate financial assistance and fair prices for farmers amid the reported suicide cases in Vidarbha.

esakal

Updated on: 

यवतमाळ : विदर्भात सहा दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या;किशोर तिवारी यांचा हल्लाबोल; घोषणांपेक्षा जगण्यासाठी पैसा द्या विदर्भाच्या काळ्या मातीत शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचा दावा विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केला आहे. मागील सहा दिवसांत विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, ही आठ कुटुंबांवर कोसळलेली शोकांतिका आहे. शेतकऱ्यांना आश्वासनांची नव्हे, तर जगण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

Loading content, please wait...