
नागपूर : लवकर आगमनाची चाहूल देत मॉन्सूनने पाठ फिरविल्यामुळे विदर्भात सर्वत्र पेरण्या खोळंबल्या आहेत. मॉन्सून रिकाम्या हाताने दाखल झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वमोसमी पाऊस बरसल्यानंतर शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.