Vidarbha News: विदर्भात उष्णतेची भीषण लाट; अमरावतीत पारा ४६.८ अंशांवर; अंगाची लाहीलाही

Amravati Records Highest Temperature in Maharashtra: नागपूर, अकोला आणि वर्ध्यातही उष्णतेचा कहर वाढला असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

नागपूर: हवामान विभागाने दिलेला तापमानाचा यलो व ऑरेंज अलर्ट आज तंतोतंत खरा ठरला. नागपूरच्या कमाल तापमानाने ४५.५ अंशांपर्यंत उसळी घेतली. विदर्भासह राज्यात सर्वाधिक ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावतीत झाली. अकोला व वर्धा येथेही उन्हाचे चटके बसले. नवताप जसजसा जवळ येत आहे, तसतसा सूर्याचा प्रकोप वाढत आहे. मंगळवारीही विदर्भात उष्णलाटेचा प्रभाव जाणवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com