manora flood
manora floodesakal

Vidarbha Rain News : कारंजा, मानोरा तालुक्यात मुसळधार

गावांत पाणी : मानोरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती खरडली

वाशीम : दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी (ता.२१ ) झालेल्या पावसाने कारंजा व मानोरा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.कारंजा तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, तर मानोरा तालुक्यातील अनेक गावातील नदीकाठची जमीन खरडून गेली आहे.

मानोरा तालुक्यात दोन दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक शेतात पाणी साचले आहे. नदीनाल्याच्या काठावरील काही घरात पाणी शिरले आहे. इझोरी येथील पुलावरून पाणी वाहत आहे. अरुणावती, धावंडा आणि अडाण नदीला पूर आला आहे. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली आहे.

तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. ज्यांचे घरात पाणी शिरले त्यांना ताबडतोब खावटी देण्यात यावी. अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे. कोलार, पोहरादेवी, वाईगौळ, इझोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळला आहे.

manora flood
Vidarbha Rain News : काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात अडीच फुटाने वाढ

मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे गावाजवळील नाल्याला पुर आल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. जाणगीर महाराज संस्थाननजीकच्या नाल्याला पूर आला होता. पुलावरून तब्बल दोन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांचा शिरपूर गावाशी संपर्क तुटला होता.

शिरपूरहुन करंजी मार्गे वाशीम, शेलगाव , दापुरीकडे जाण्या-येण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात येतो. येथील करंजी, शेलगाव शेतशिवाराकडे शिरपूर येथील लोकांच्या शेतजमिनी असल्याने नागरिकांना या नाल्यावरील धोकादायक पूल ओलांडून जावे लागते. सदर पूल बांधून तब्बल ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला आहे.

manora flood
Vidarbha Flood News : पुलांना जोडणारे रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला; जिल्हयातील १३ मार्ग बंद

बेंबळा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कारंजा तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी-नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून काही गावांना पाण्याचा वेढा बसला आहे तर शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली येऊन खरडून गेली आहे.

कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे, कामरगाव, धनज ''बु''महसूल मंडळात ७५ मिलीमीटर पाऊस पडला. बेंबळा नदीला आलेल्या पुराचे पाणी लाडेगावात घुसल्याचे शेतात गेलेले काही शेतकरी पुरामुळे तिकडेच अडकले. पुरात अडकलेली गुरे ग्रामस्थांनी बाहेर काढली. नदीकाठावरील शेमलाई, लाडेगाव,

कु-हाड, भुलोडा, बेलखेड, हिंगनवाडी, कामठा, ब्राम्हणवाडा, पिंपळगाव, आंबोडा, राहटी, कुट्टी, पोहा, पलाना येथील शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली. खेर्डाजिरापूरे,अलिमर्दापूर, येवता,यावार्डी, धानोरा ताथोड, कार्ली, आखतवाडा, धनज ''बु'', हिवरा लाहे येथेही शेतीचे नुकसान झाले आहे.

हिवरा लाहे येथील कमळगंगा लघू तलाव ओव्हरफ्लो झाल्याने हिवरा लाहे गावात पाणी घुसले. लघू तलावाचे पाणी काही शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिंप्री मोडक येथील विघ्नेश्वर निवासी आश्रम शाळेच्या पाठीमागून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचे पाणी अचानक आश्रम शाळेच्या आवारात आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली परंतू ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी ४५ विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविले.

manora flood
Vidarbha Rain Update: पावसाचा हाहाकार! २८० जणांचे स्थलांतर, अनेकांचे संसार उघड्यावर... बळीराजा संकटात

वाहतूक खोळंबली

नागपूर संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक खेर्डा जिरापूरे येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे तीन तास खोळंबली होती. तर झोडगा धनज ''बु'',कामरगाव लाडेगाव, पिंप्री मोडक लाडेगाव शेमलाई ब्राम्हणवाडा, कारंजा आखतवाडा या रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली होती.

रुई,गोस्ता,वटफळ,मेंद्रा इंगलवाडी कारपा परिसरातील शेतीचे बांध फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. या सात गावातील शेती पूस नदीच्या पाण्याने खरडून गेली आहे. इकडे धावंडा नदी दुथडी भरून वाहत असल्याने आमकिन्ही, गोंडेगाव, शेदोना, सातघरी, बळीराम नगर येथील घराची पडझड झाली आहे.

पुराने मृतदेह खोळंबला

कारंजा मोहगव्हाण कारंजा येथील सागर अवताडे या युवकाचा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर दरम्यान २१ जुलै रोजी अपघाती मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे मोहगव्हाण लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने गावचा संपर्क तुटला असून मृतदेह गावात अद्याप पोहचू शकला नाही. तहसीलदार कुणाल झाल्टे व सासचे श्याम सवाई यांनी पुर ओसरेपर्यंत मृतदेह कारंजात ठेवण्याची व्यवस्था केली आहे परंतू ग्रामस्थ प्रेतगावी नेण्यासाठी धोका पत्करू पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com