

Vidarbha Rain
esakal
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर मंगळवारी विदर्भभर पुनरागमन करत सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली. बहुतांश जिल्ह्यांत संततधार किंवा रिमझिम पाऊस झाल्याने कोमेजलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार पाऊस नसला तरी पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरत असून पेरणी, रोवणी आणि आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे.