

गडचिरोली : निसर्गाचे वरदान लाभलेला गडचिरोली जिल्हा संस्कृती, भाषा व साहित्यदृष्ट्याही अतिशय समृद्ध आहे. आता येथे विदर्भा साहित्य संघाची जिल्हा कार्यकारिणी कार्यरत होत असून येथील साहित्यिक, नवसाहित्यिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.