विदर्भातून कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विदर्भातल्या या जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला साली जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी विदर्भ कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं औत्सुक्‍याचं आहे.

काँग्रेसला आणि आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपची मातृसंस्था असलेले संघाचं मुख्यालय अशा अनेक गोष्टींमुळे विदर्भातली लढत भाजपसाठी अतीशय प्रतिष्ठेची आहे. यावेळी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला तर काँग्रेस-आघाडीनेही कंबर कसली होती. भाजपच्या जागांच्या एकूण गणितामध्ये विदर्भ भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.  

यवतमाळमधून भाजपचे मंत्री मदन येरावार पिछाडीवर असून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर आघाडीवर आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

 • अकोटमधून भाजपचे प्रकाश भारसाकळे आघाडीवर
 • मूर्तीजापूरमधून वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचर आघाडीवर
 • अचलपूरमधून बच्चू कडू पिछाडीवर
 • ब्रम्हपुरीमधून कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर
 • भंडाऱ्यामध्ये अपक्ष नरेंद्र भोंडकर आघाडीवर
 • मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर
 • राजुरामध्ये शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आघाडीवर
 • दर्यापूरमधून भाजपचे रमेश बुंदीले आघाडीवर
 • उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाणे आघाडीवर
 • बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर
 • आर्वीत भाजपचे दादाराव केचे आघाडीवर
 • अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
 • गडचिरोली- अहेरीमधून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा अत्राम तिसऱ्या फेरीनंतर आघाडीवर
 • काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर
 • चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आघाडीवर
 • वर्ध्यातून कॉंग्रेसच्या शेखर शेंडेंना आघाडी
 • चिखलीमधून भाजपच्या श्वेता महाले आघाडीवर
 • गोंदियामधून अपक्ष विनोद अग्रवाल आघाडीवर
 • बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर
 • नागपूर दक्षिण पश्‍चिम- दुसऱ्या फेरीनंतर देवेंद्र फडणवीस आघाडीवर
 • सहाव्या फेरीनंतर अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
 • मोर्शीवरून कृषीमंत्री अनिल बोडे पिछाडीवर, आघाडीचे देवेंद्र भुयार आघाडीवर
 • साकोलीमधून भाजपचे परणिय फुके आघाडीवर
 • हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावर आघाडीवर
 • धामणगावमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर
 • मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती तिसऱ्या फेरीत आघाडीवर
 • अकोला पश्‍चिममधून कॉंग्रेस, अकोला पूर्वमधून भाजप, बाळापूरमधून शिवसेना, अकोटमधून भाजप आघाडीवर
 • मोरगाव अर्जुनीमधून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
 • उत्तर नागपूरमधून कॉंग्रेसचे नितीन राऊत आघाडीवर
 • काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर
 • मलकापूरमधून कॉंग्रेसचे राजेश एकडे दुसऱ्या फेरीत आघाडीवर
 • नागपूर मध्यमधून कॉंग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर
 • तिवसामधून कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर पिछाडीवर
 • बुलडाण्यातून शिवसेना उमेदवार आघाडीवर
 • बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर
 • उमरखेडमधून कॉंग्रेसचे विजय खडसे आघाडीवर
 • वरोरातून शिवसेनेचे संजय देवतळे आघाडीवर
 • अकोल्यातून पाचव्या फेरीत भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
 • वणीमधून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आघाडीवर
 • अचलपूरमधून अपक्ष बच्चू कडू आघाडीवर
 • अहेरीमधून भाजपचे राजे अम्ब्रिश आत्राम आघाडीवर
 • राजुरामधून कॉंग्रेसचे सुभाष धोटे आघाडीवर
 • धामणगाव रेल्वेमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर
 • कारंजामधून भाजपचे राजेंद्र पाटणी आघाडीवर
 • पश्‍चिम नागपूरमधून भाजपचे सुधाकर देशमुख आघाडीवर
 • आर्णीमधून संदीप धुर्वे आघाडीवर
 • तुमसरमधून राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आघाडीवर
 • बुलडाण्यातून शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर
 • आरमोरीमधून भाजपचे कृष्ण गजबे आघाडीवर
 • बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर
 • गोंदिया तिरोडामधून भाजपचे विजय रहांगडले आघाडीवर
 • बडनेऱ्यातून महाआघाडीचे रवी राणा आघाडीवर
 • आर्णीतून कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे आघाडीवर
 • चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरामध्ये कॉंग्रेस आघाडीवर, राजुऱ्यात शेतकरी संघटना आणि चंद्रपूरमध्ये अपक्ष आघाडीवर, फक्त बल्लारपूरमध्ये भाजपला आघाडी
 • अकोला पश्‍चिममधून कॉंग्रेसचे साजीद खान पठाण आघाडीवर
 • नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर
 • भाजपचे संजय कुटे आघाडीवर
 • शिवसेनेचे संजय रायमूलकर आघाडीवर
 • खामगावमधून आकाश फुंडकर आघाडीवर
 • कामठीमधून टेकचंद सावरकर आघाडीवर
 • पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर
 • सकाळी वाजता : मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर
 • देवळी-पुलगाव दुसऱ्या फेरीत कॉंग्रेसचे रणजीत कांबळे आघाडीवर
 • राजुरामधून शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आघाडीवर
 • गोंदियातून भाजपचे गोपाल अग्रवाल पिछाडीवर
 • पहिल्या फेरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मतांनी आघाडीवर
 • दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर
 • वरोरातून कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर
 • मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर आघाडीवर
 • चिमूरमधून कॉंग्रेसचे सतीश वारजूकर आघाडीवर
 • अमरावतीतून भाजपच्या सुनील देशमुखांना आघाडी
 • मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती पिछाडीवर, कॉंग्रेसच्या राजेश एकडेंना आघाडी
 • तिवसातून शिवसेनेचे राजेश वानखेडे आघाडीवर
 • धामणगावमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर
 • काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर, भाजपचे चरणसिंग ठाकूर पिछाडीवर
 • अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर
 • जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे , मतांनी आघाडीवर
 • दर्यापूरमधून कॉंग्रेसचे बळंवत वानखेडे मतांनी पुढे
 • यवतमाळमधून पालकमंत्री मदन येरावार आघाडीवर, कॉंग्रेसच्या बाळासाहेब मांगूळकर यांना आघाडी
 • बल्लारपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
 • नागपूरच्या पैकी जागांवर भाजप आघाडीवर
 • विदर्भात पैकी जागांवर भाजप, जागेवर कॉंग्रेस आणि जागेवर राष्ट्रवादी आघाडीवर
 • बडनेरामध्ये आघाडीचे रवी राणा पुढे
 • कारंजातून पोस्टल बॅलटमध्ये भाजपचे राजेंद्र पाटणी आघाडीवर
 • सावेरमधून कॉंग्रेसचे सुनील केदार आघाडीवर
 • हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर
 • देवळीतून कॉंग्रेसचे रणजीत कांबळे आघाडीवर
 • नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर
 • टपाली मतदानात नागपूर दक्षिण पश्‍चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर, हिंगण्यातून भाजपचे समीर मेघे, काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha vidhan sabha election 2019 live result