Vidarbha Weather: विदर्भात वादळासह गारपिटीचीही शक्यता; विदर्भात तीन-चार दिवस यलो अलर्ट, सावधानतेचा इशारा

Yellow Alert Issued for Vidarbha Due to Weather Systems: विदर्भात १३ ते १६ मार्चदरम्यान वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा.
Vidarbha Weather

Vidarbha Weather

sakal

Updated on

नागपूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ची स्थिती, अशा दुहेरी संकटामुळे वैदर्भीय शेतकऱ्यांसाठी पुढील दोन-तीन दिवस अत्यंत कठीण ठरण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने १३ ते १६ मार्चदरम्यान नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पूर्वेतिहास बघता, या काळात गारपिटीचीही शक्यता नाकारता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com