Nitin Gadkari: विदर्भात उद्योगवाढीसाठी सीआयआयने अभ्यास करावा; नितीन गडकरी, केंद्र व राज्याचे सहकार्य असणार
Nagpur News: विदर्भात हरित उद्योग आणि लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून औद्योगिक विकासाची नवी दिशा तयार होते आहे. नागपूर हे या विकासाचा मॉडेल ठरावे, असे गडकरी म्हणाले.
नागपूर : विदर्भाचे भविष्य हरित उद्योग आणि एकात्मिक लॉजिस्टिक्समध्ये आहे. नागपूर हे एक मॉडेल बनले पाहिजे. कुठल्याही उद्योगाच्या विकासासाठी पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संचार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.