Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश
Pandharpur Wari: विदर्भातील कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे पहिली पायदळ पालखी १५९४ मध्ये निघाली होती. सदराम महाराजांनी सुरू केलेल्या या ४३१ वर्ष जुन्या परंपरेने आज लाखो वारकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.
मांजरखेड : पंढरपूरला पहिली पायदळ पालखी काढण्याचा मान हा विदर्भाला जातो. श्री विठ्ठलाच्या जीवनसंगिनी असलेल्या माता रुक्मिणी यांचे माहेर असलेले कौंडण्यपूर (जि. अमरावती) येथून १५९४ मध्ये पहिली पायदळ पालखी काढण्यात आली.