विजय घोडमारे म्हणाले, आमदार मेघे यांचा विकासाचा दावा खोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

वाडी (जि. नागपूर) : हिंगणा विधानसभेत आमदार समीर मेघे यांची बॅनरबाजी दिसून येते. 2,600 कोटींच्या विकासाचा दावा केला जात आहे; जो फोल आहे, असा आरोप भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची घड्याळ बांधणारे विजय घोडमारे यांनी केला.

वाडी (जि. नागपूर) : हिंगणा विधानसभेत आमदार समीर मेघे यांची बॅनरबाजी दिसून येते. 2,600 कोटींच्या विकासाचा दावा केला जात आहे; जो फोल आहे, असा आरोप भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची घड्याळ बांधणारे विजय घोडमारे यांनी केला.
दत्तवाडी स्थित शुभम मंगल कार्यालयात बुधवारी (ता. 18) सायंकाळी कॉंग्रेस-राकॉंचे कार्यकर्ता संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते. उद्‌घाटन रमेशचंद्र बंग यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, भीमराव कडू, भीमराव लोखंडे, प्रवीण खोडे, नगरसेवक राजेश जैस्वाल, नगरसेवक श्‍याम मंडपे, प्रमिला पवार, प्रशांत कोरपे, अश्‍विन बैस, राजेश जिरापुरे उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन तालुक्‍यांत 700 कोटींची कामे केली. मग हिंगणा क्षेत्रात 2,600 कोटींचे कार्य कसे संभव आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 900 कोटींचे विकास कार्य झाले. यावरून समीर मेघेंचा विकास खर्च पाहता त्यांना मुख्यमंत्री बनविले पाहिजे. 2,600 कोटींत समीर मेघे यांनी क्षेत्राच्या बाहेरचा निधीही जोडल्याचे प्रतीत होते. वाडीत भीषण पाणीटंचाई, आरोग्य समस्या, रास्त्यांचे हाल बेहाल आहेत. वाडीचा विकास पागल झाला आहे. अशा असत्य व घोषणाबाज आमदारांना बदलणे आवश्‍यक झाले आहे, असेही विजय घोडमारे म्हणाले. राज्य व हिंगणा विकासापासून कोसो दूर आहे. बेरोजगारी व शेतकरी आत्महत्या वाढली आहे. असंवेदनशील सरकारमुळे जनता त्रस्त झाली आहे, असे रमेशचंद्र बंग म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनेही मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Ghodmare said, MLA Meghe's claim of development is false