गावकरी चढले टॉवरवर;वेकोलिविरोधात संताप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर : सिनाळा, मसाळा आणि नवेगाव या तीन गावांचे वेकोलिच्या माध्यमातून पुनर्वसन होत आहे. मात्र, पुनर्वसन चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने त्याला या तिन्ही गावांतील नागरिकांचा विरोध आहे. वेकोलि बळजबरीने काम करीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर संतापलेले गावकरी आज टॉवरवर चढले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी मध्यस्ती करून वेकोलिच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर गावकरी टॉवरखाली उतरले.

चंद्रपूर तालुक्‍यातील सिनाळा, मसाळा आणि नवेगाव येथे वेकोलिच्या कोळसा खाणी होत आहेत. या खाणींसाठी या भागातील अनेक गावकऱ्यांच्या जमिनी वेकोलिने संपादित केल्या. सिनाळा, मसाळा आणि नवेगावातील नागरिकांचे पुनर्वसन वेकोलिच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, अनेक कामे व्यवस्थितरीत्या केली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना कित्येकदा सांगण्यात आले. मात्र, त्याकडे वेकोलि व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेले नागरिक आज टॉवरवर चढले.
या आंदोलनाची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, महानगरप्रमुख प्रमोद पाटील, तालुकाप्रमुख संतोष नरुले घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या मध्यस्तीने वेकोलि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात गावकऱ्यांचे प्रश्‍न सुटेपर्यंत गावाच्या पुनर्वसनासंबंधात कुठलेही काम होणार नाही, असे लिखित स्वरूपात लिहून घेण्यात आले. कुठलेही खोदकाम पुनर्वसन होईपर्यंत करण्यात येणार नाही. ज्या रस्त्यावर वेकोलिचे डम्पर चालतील त्यावर धुळीच्या नियंत्रणासाठी पाणी फवारणीची व्यवस्था करण्यात येईल. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गावाच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे टाकण्यात येणार नाही. टॉवरलाइनचे काम करताना कोणाचेही नुकसान झाल्यास त्याला वेकोलितर्फे भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers climb to the tower; Anger against WCL