
नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव आणि परिसरातील १० गावे स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर बसलेली आहेत. या गावांतील सात किलोमीटर परिसरात ११ बारूद कारखाने आहेत. कारखान्यात काही स्फोटाची घटना घडल्यास गावातील लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडतात. गेल्या दीड वर्षांत चार मोठे स्फोटांमध्ये २२ कामगारांचा जीव गेल्याने या भागातील नागरिक नेहमीच अनाहुत भीतीच्या सावटात वावरतात.