व्हीएनआयटीचे विद्यार्थी फुलविणार गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : समाजातील गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने देशातील "गुंज' ही सामाजिक संस्था कार्य करते. या संस्थेला मदत म्हणून विश्‍वेश्‍वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या "प्रयास' या सामाजिक क्‍लबच्या माध्यमातून उद्या शनिवारपासून (ता. 28) ते 6 ऑक्‍टोबरदरम्यान "जॉय ऑफ गिव्हिंग' अभियान राबवून गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणार आहे. अभियानात शहरात तयार केलेल्या 29 केंद्रांवर साहित्य जमा करणार आहे.

समाजात बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपेक्षित वर्ग आहे. त्यांना कपडे सोडाच दोन वेळचे खायचे अन्न मिळत नाही. अशा लोकांना गुंज संस्थेद्वारे फॅमिली किट, स्कूल किट आणि डिग्नीटी किट (महिलांसाठी) देण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून संस्था या क्षेत्रात काम करते. देशभरातील 21 राज्यांतून दरवर्षी 1 हजार टन साहित्य एकत्रित करून त्याचे वाटप करण्यात येते. या संस्थेला मदत करण्याच्या उद्देशाने व्हीएनआयटीमधील "प्रयास' या विद्यार्थ्यांच्या सामाजिक संस्थेने "जॉय ऑफ गिव्हिंग' हे अभियान हाती घेतले आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अभियानातून विविध प्रकारचे साहित्य गोळा करण्यात येते. गेल्यावर्षी जवळपास सहा ट्रक साहित्य जमा करण्यात आले होते. जमा झालेल्या साहित्यातून संस्था विविध ठिकाणी येणाऱ्या आपत्तीत होरपळलेल्या कुटुंबांना मदत करीत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम करते. विशेष म्हणजे केवळ आपत्तीदरम्यानच नव्हे तर समाजातील गरजवंतांनाही मदत केली जाते. यासाठी ओला-उबेर, रोटरी, इंडियन ऑइल आणि विविध कॉलेजची मदत "प्रयास'द्वारे घेण्यात येते. त्यातूनच या अभियानात शहरात 29 केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. या केंद्रावर गरजूंसाठी साहित्य जमा करावे लागणार आहे. उद्या या केंद्रांचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. 2 ऑक्‍टोबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजाप्रती काहीतरी देणं या नात्याने प्रयत्न करणाऱ्या "प्रयास'द्वारे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याचा वसा घेतल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने "प्रयास'च्या माध्यमातून विविध उपक्रम घेण्यात येते. मात्र, त्यातील दानोत्सव म्हणजेच "जॉय ऑफ गिव्हिंग' या उपक्रमातून गरजूंना आवश्‍यक असलेले साहित्य एकत्रित करून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. यासाठी संपूर्ण विद्यार्थी परिश्रम घेत असतात.
- डॉ. दिलीप पेशवे, प्रोफेसर, व्हीएनआयटी.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VNIT students will blossom in the face of need