Maharashtra vidhansabha 2019 मतेंसोबत हस्तांदोलन कुमेरियांना पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याशी हस्तांदोलन करणे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार किशोर कुमेरिया यांना चांगलेच महागात पडले. हस्तांदोलनाच्या फोटोसह मते यांना समर्थन दिल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुमेरियांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी कुमेरिया यांनी फोटो व्हायरल करणारे सतीश बिहारे या भाजप कार्यकर्त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात आज भाजपचे उमेदवार मोहन मते व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार किशोर कुमेरिया एकमेकांपुढे उभे ठाकले. मतदारसंघात दोघेही उमेदवार जनतेकडे मतांची मागणी करीत होते. मते व कुमेरिया एकाच भागात मतांची मागणी करीत असल्याने एकमेकांपुढे आले. कुमेरिया यांनी औपचारिकता म्हणून त्यांची भेट घेतली. दोघांनीही हस्तांदोलन करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, हस्तांदोलनावेळी मते यांच्या समर्थकांनी मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढले. काही वेळातच सतीश बिहारे या भाजप कार्यकर्त्याने फेसबुकवर हे फोटो "अपलोड' केले. फोटोसह मते यांना कुमेरिया यांचे समर्थन, अशी चुकीचीही माहितीही पोस्ट केली. त्यामुळे किशोर कुमेरिया यांनी नंदनवन पोलिस स्टेशन गाठत बिहारे यांची तक्रार केली. या प्रकारामुळे कार्यकर्ते विचलित झाले असून, बदनामीकारक मजकुरासाठी बिहारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. यावेळी नंदनवन पोलिसांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, त्यांच्या आदेशाने कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन कुमेरिया यांना दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the votes, the hands of the Kumrians have fallen in cost